Advertisement

"त्याला महत्त्व देऊ नये",अजित पवारांची राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या उत्तर सभेला प्रत्युत्तर दिलं आहे.

"त्याला महत्त्व देऊ नये",अजित पवारांची राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींमध्ये लाऊडस्पीकरच्या वापराबाबत दिलेल्या अल्टिमेटमच्या एका दिवसानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी, १३ एप्रिल रोजी सांगितलं की, त्यांना फारसे महत्त्व देऊ नका.

“राज ठाकरेंना इतकं महत्त्व देऊ नये, योग्य वेळ आल्यावर मी नक्की उत्तर देईन, माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे,” असं पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

मंगळवार, १२ एप्रिल रोजी, ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मशिदींमधील लाऊडस्पीकर काढण्यासाठी महाविकास आघाडीला (MVA) अल्टिमेटम दिलं आहे.

३ मे पर्यंत मशिदींमधून लाऊडस्पीकर काढून टाकण्यात सरकार अपयशी ठरल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास मशिदीबाहेर 'हनुमान चालीसा' बजावण्याची धमकी त्यांनी पुन्हा एकदा दिली.

“सर्व मौलवींच्या बैठका घ्या आणि मशिदींमधून लाऊडस्पीकर काढा. ३ मे नंतर हनुमान चालीसा लाऊडस्पीकर असलेल्या कोणत्याही मशिदीबाहेर वाजवण्यात येईल,” असं ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत सांगितलं.

याव्यतिरिक्त, ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईतील मुस्लिम भागातील मशिदींवर छापे टाकण्याचे आवाहन केले आणि तेथे राहणारे काही लोकं आतंकवादी असल्याचं देखील म्हटलं.

२ एप्रिल रोजी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात ठाकरे यांनी मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी सर्वप्रथम केली होती. या मागणीचा विविध स्तरातून निषेध झाला आणि पक्षाचे माजी पुणे शहरप्रमुख वसंत मोरे यांच्यासह मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला.



हेही वाचा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे १२ मुद्दे

MSRTC Strike Row: शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी पत्रकार अटकेत

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा