Advertisement

सर्व मशिदिंवरील भोंगे ३ मे पर्यंत काढा, नाहीतर - राज ठाकरे

मशिदिंवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरे यांनी मुदत दिली आहे.

सर्व मशिदिंवरील भोंगे ३ मे पर्यंत काढा, नाहीतर - राज ठाकरे
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात सभा पार पडली. या सभेत त्यांनी सर्वच पक्षांवर हल्लाबोल केला. यासोबतच भोंग्यामुळे निर्माण झालेल्या वादावर देखील त्यांनी भाष्य केलं. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आम्ही आमची भूमिका सोडणार नाही."

राज ठाकरेंनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यामधून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं होतं. मनसे भाजपाची बी टीम आहे का? अशी टीका केली जाऊ लागली होती. या सर्व मुद्द्यांना राज ठाकरे आज उत्तर देणार असल्यामुळेच या सभेला ‘उत्तरसभा’ असं नाव मनसेकडून देण्यात आलं.

राज ठाकरे म्हणाले की, मशिदींच्या भोंग्यासंबंधी सर्व मशिदींना ३ मे पर्यंत मुदत देतो, या नंतर जर कोणी भोंगे काढले नाहीत तर देशभर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्यात येणार, असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे.

"इतरांची शांती बिघडवून तुम्ही तुमचा भोंगे वाजवून प्रार्थना करा असा कोणताही धर्म सांगत नाही. इतरांची शांती भंग होईल अशा कोणत्याही गोष्टीला परवानगी देण्यात येणार नाही असं १८ जुलै २००५ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणीत सांगितलं आहे. आता ३ तारखेपर्यंत ऐकला नाही तर देशभरातील मशिदींच्या समोर हनुमान चालीसा लावा."

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे राज्यातील गृहखातं अंमलबजावणी का करत नाही असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. राज्य सरकारचे हे मतांसाठी राजकारण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

मशिदीच्या भोंग्यावर आपण या आधीही आवाज उठवल्याचं राज ठाकरेंनी या सभेमध्ये सांगितलं आहे.

ते म्हणाले की, मशिदींच्या भोंग्याच्या आवाजासंबंधी मी या आधीही आवाज उठवला होता, अजित पवारांना तो ऐकू आला नाही. या मशिदीच्या भोंग्यामुळे देशाला त्रास होतोय, यामध्ये धार्मिक विषय कुठेय? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.

ज्या भग्यामुळे त्रास होत असेल , तो खाली उतरवलाच पाहिजे. आम्ही आमची भूमिका बदलणार असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. सण असतील तर तेव्हा भोंगे लाऊडस्पीकर असू द्या मात्र 365 दिवस त्यांचा त्रास का ? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारले आहे.

भोंगे लावून अजान म्हणायची काय गरज आहे, असे मी आज नाही 2018 पासून म्हणत आहे, अजित पवारांना हे कदाचित आठवत नसेल, धर्म आपल्या घरात ठेवायला हवा. प्रार्थना आपली आहे, ती आपल्यापर्यंत ठेवायला हवी आम्हांला का ऐकवता. असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे. जर तुम्हाला हे समजले नाही, तर आम्हाला चालिसा लावावी लागेल असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. या भोंग्यांचा सर्व देशाला होत आहे,असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा