Advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे १२ मुद्दे

जाणून घ्या राज ठाकरे यांच्या भाषणातील काही मुद्दे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे १२ मुद्दे
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या सभेत महाविकासआघाडीवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर रोखठोक भाष्य केलं. यामध्ये मशिदिंवरील भोंग्याच्या मुद्द्यापासून ते गुढीपाडव्याला केलेल्या भाष्यावरून झालेल्या वादापर्यंत सर्वांची उत्तरं राज ठाकरेंनी या सभेत दिली. जाणून घ्या राज ठाकरे यांच्या भाषणातील काही मुद्दे  

  • गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेक नेत्यांनी अकलेचे तारे तोडले. त्याचं उत्तर मला द्यायचं होतं. पण पत्रकार परिषद घेऊन मला याचं उत्तर द्यायचं नव्हतं.
  • सभेकडे येताना अग्निशमन दलाचा बंब दिसला. इतकी काही आग लावणार नाहीय.
  • माझ्या ताफ्याला अडवणार हे गुप्तचर यंत्रणेला माहीत आहे. पण पवार साहेबांच्या घराकडे एसटी कर्मचारी जाणार हे माहीत नव्हतं.
  • ज्यावेळी मी नरेंद्र मोदींवर बोलत होतो, त्यावेळी त्यांच्या भूमिका पटल्या नव्हत्या. उघडपणे बोललो. आता ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला. मी नाही ट्रॅक बदलला. मला नाही लागत ट्रॅक बदलायला.
  • शरद पवार साहेबांना नुसती चाहूल लागली ईडीच्या नोटिशीची, त्यावर केवढं नाटक केलं. या हातानं पापच केलेलं नाही, तर नोटिशी कोणतीही येवो, भीक नाही घालत मी त्यांना.
  • विझणारा नाही हा विझवणारा पक्ष आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी जयंत पाटील यांच्यावर जंत पाटील म्हणत टीका केली आहे.
  • तर सुप्रिया सुळेंचे दाखवायचे दात वेगळे तर खायचे सुळे वेगळे अशी खोचक टीका सुप्रिया सुळेंवर राज ठाकरेंकडून करण्यात आली आहे.
  • नरेंद्र मोदींना माझं सांगणं आहे की, एक म्हणजे समान नागरी कायदा आणा आणि दुसरं म्हणजे या देशातील लोकसंख्येवर नियंत्रण ठेवता येईल असा कायदा आणा.
  • अजित पवार म्हणतात, यांना भोंगे आताच आठवले का? याआधी काय झोपा काढत होते का? हे दाखवण्यासाठी मी तीन व्हिडीओ आणले आहेत. सोक्षमोक्ष लावलेला बरा असतो. भोंग्यांवर याआधीही बोललो. पण अजित पवारांना ऐकू आलं नसेल. लॉकडाऊनमध्ये कान साफ झाले असतील.
  • तुम्हाला नमाज पढायचीय, अजान द्यायचीय, घरामध्ये द्या. शहरांचे रस्ते, फूटपाथ कशाला अडवताय? प्रार्थना तुमची आहे, आम्हाला का ऐकवताय? सांगून पटत नसेल, तर तुमच्या मशिदीच्या बाहेर हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार
  • शरद पवारांनी आणि राष्ट्रवादीने सांगावं? की राज ठाकरे भूमिका बदलतो? परदेशी पंतप्रधान चालणार नाही, म्हणत पवार काँग्रेसमधून बाहेर पडले. दोन महिन्यात काँग्रेससोबत गेले आणि कृषिमंत्री झाले. असंख्य भूमिका बदलल्याचे सांगता येतील.
  • गुढीपाडव्याच्या सभेनंतर एकदम सगळे सरपटले. मग एकच पालुपद लावलं, ईडीची नोटीस आली, ईडीची नोटीस आली. परत आली तर परत जाईन. तुम्ही जाताय का? नुसत्या संपत्त्या जप्त केल्या तर पत्रकार परिषदेत शिव्या देऊ लागले.



हेही वाचा

सर्व मशिदिंवरील भोंगे ३ मे पर्यंत काढा, नाहीतर - राज ठाकरे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा