Advertisement

ज्या दिवशी १२ आमदारांची नावं जाहीर होतील.., अजित पवारांचं भन्नाट उत्तर

वैधानिक विकास महामंडळाच्या पुर्नस्थापनेवरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भन्नाट उत्तर दिलं.

ज्या दिवशी १२ आमदारांची नावं जाहीर होतील.., अजित पवारांचं भन्नाट उत्तर
SHARES

वैधानिक विकास महामंडळाच्या पुर्नस्थापनेवरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भन्नाट उत्तर दिलं. यामुळे भाजप (bjp) नेते अधिकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवाय १२ आमदारांच्या नियुक्तीवरून पुन्हा एकदा राजकारण रंगण्याचीही शक्यता आहे.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास महामंडळाच्या पुर्नस्थापनेवरून राज्य सरकारला धारेवर धरलं. वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना ७२ दिवस झाले तरी सरकारने केलेली नाही. विदर्भ, मराठवाड्यातील जनताही महाराष्ट्रातील आहे हे लक्षात‌ ठेवावं. राजकीय डावपेचात वैधानिक विकास मंडळ अडकता कामा नये.

या सभागृहात मला कोरोना होणार नाही म्हणून बसायचं आहे की जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी बसायचं आहे? हे ठरवावं. अजित पवार ७२ दिवसांपूर्वी दिलेलं आश्वासन पूर्ण करणार आहेत की नाही एवढंच सांगावं,असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी उपस्थित केला. शिवाय, हे तर मुख्यमंत्र्यांचं आजोळ आहे, नातवाने पेटून उठलं पाहिजे. १० दिवसांचं अधिवेशन एकदम १० नंबरी झालं पाहिजे, असंही मुनगंटीवार म्हणाले.

त्याला उत्तर देताना अजित पवार (ajit pawar) म्हणाले, आम्ही वैधानिक विकास महामंडळ स्थापन करु, याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. या महामंडळांसाठी अर्थसंकल्पात पुरेशा निधीची तरतूद करू. मात्र मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला आहे. तो असा की ज्या दिवशी १२ आमदारांची नावं जाहीर करण्यात येतील त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करु. १० नंबरी काय आणि पुढचा कोणता नंबर लावा तसं अधिवेशन करु, असं सडेतोड उत्तर अजित पवार यांनी यावेळी दिलं. विरोधक गदारोळ घालू लागल्यावर तुमचं ऐकलं आता माझं ऐकून घ्या म्हणत अजित पवारांनी त्यांना सुनावलं.

(ajit pawar reply to sudhir mungantiwar on statutory development corporation appointment in maharashtra assembly budget session 2021)


हेही वाचा-

नवी मुंबईत साडेपाच लाख कोरोना चाचण्या

बाळासाहेब ठाकरे स्मारक प्रकल्पासाठी ४०० कोटींच्या खर्चाला मान्यता


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा