Advertisement

मुंबई: अक्षय कुमारने आदित्यनाथ यांची भेट घेतली

योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर असताना अक्षयने त्यांची भेट घेतली.

मुंबई: अक्षय कुमारने आदित्यनाथ यांची भेट घेतली
SHARES

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अक्षय कुमारने (Actor Akshay kumar) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi adityanath) यांची मुंबईत भेट घेतली. त्याने यूपीमधल्या आगामी फिल्म सिटीबाबत चर्चा केली. योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर असताना अक्षयने त्यांची भेट घेतली.

एका हॉटेलमध्ये त्यांची बैठक 35 मिनिटं चालली होती, असं उत्तर प्रदेश मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या संदर्भातलं वृत्त 'इंडिया टीव्ही'ने दिलं आहे.

अक्षय कुमारने आदित्यनाथ यांना त्याचा अलीकडेच प्रदर्शित झालेला 'राम सेतू' हा चित्रपट पाहण्याची विनंती केली. तसंच उत्तर प्रदेश सरकार विकसित करत असलेल्या उत्तर प्रदेश फिल्म सिटीच्या उद्घाटनाची वाट आपण पाहत असून, ही फिल्म सिटी हिंदी फिल्म (UP film city) इंडस्ट्रीसाठी नवीन पर्याय उपलब्ध करून देईल, असंही तो म्हणाला.

सामाजिक जाणीव निर्माण करण्यात, जनजागृती करण्यात आणि सामाजिक आणि राष्ट्रीय कामांना चालना देण्यासाठी चित्रपट महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, असं मत योगी आदित्यानाथ यांनी व्यक्त केलं.

चित्रपट निर्मात्यांनी विषय निवडताना सामाजिक आणि राष्ट्रीय जाणिवेच्या मुद्द्यांना महत्त्व दिलं पाहिजं, असंही ते म्हणाले. त्यांचं सरकार लवकरच सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टमसह नवीन चित्रपट धोरण राबवणार आहे. उत्तर प्रदेशची फिल्म सिटी जागतिक दर्जाची असेल, असंही ते या वेळी म्हणाले.

अक्षय कुमार आदित्यनाथ यांना म्हणाला, की नव्या फिल्म सिटी प्रोजेक्टबद्दल भारतीय चित्रपट उद्योगात मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. अनेक मोठी प्रॉडक्शन हाउसेस, निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते यूपीमधली फिल्मसिटी सुरू होण्याची वाट पाहत आहेत.

यूपीमध्ये जागतिक दर्जाची फिल्म आणि इन्फोटेनमेंट सिटीच्या विकासामुळे चित्रपट व्यवसायात असलेल्यांना त्यांच्या प्रकल्पांची आखणी करण्यासाठी एक नवीन पर्याय उपलब्ध होईल.



हेही वाचा

‘संजय आठवतोय का?’; उर्फी जावेदचा चित्रा वाघ यांच्यावर पुन्हा हल्लाबोल

धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, छातीला मार आणि...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा