Advertisement

धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, छातीला मार आणि...

दुपारी दोन वाजता लातूर येथून विमानानं धनंजय मुंडे हे मुंबईकडे उपचारासाठी रवाना होतील.

धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, छातीला मार आणि...
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे (National Congress Party) आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. परळीकडे (Beed News) जात असताना धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात (Accident News) झाल्याची माहिती स्वतः धनंजय मुंडे (Dhananjay Munde News) यांनी फेसबुक पोस्टद्वारे (Facebook Post) दिली आहे. (NCP MLA Dhananjay Munde met with Accident)

चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं अपघात झाल्याचं फेसबुक पोस्टमधून धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. या अपघातात छातीला किरकोळ मार लागल्याची माहितीही धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमधून दिली आहे. धनंजय मुंडे ((Dhananjay Munde Accident News) यांना पुढील उपचारासाठी मुंबईला (Mumbai News) हलवलं जाण्याची शक्यता आहे.

दुपारी दोन वाजता लातूर येथून विमानानं धनंजय मुंडे हे मुंबईकडे उपचारासाठी रवाना होतील. धनंजय मुंडे यांच्या बरगड्यांना दोन ठिकाणी मार लागला असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल केलं जाणार आहे.

धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करत अपघातासंदर्भात माहिती दिली. फेसबुक पोस्टमध्ये धनंजय मुंडे यांनी लिहिलंय की, "मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम आणि भेटी आटपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये."



हेही वाचा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला जाण्याची शक्यता

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा