निवडणुकीच्या तोंडावर व्यायाम शाळेचं उद् घाटन

जोगेश्वरी - स्वामी समर्थ व्यायाम शाळा आणि उद्यानाचं उद्घाटन युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याहस्ते सोमवारी करण्यात आलं. यावेळी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, आमदार सुनील प्रभू, खासदार विनायक राऊत यांनी हजेरी लावली होती. स्थानिक नगरसेविका शिवानी परब यांच्या निधीतून हे उद्यान आणि व्यायामशाळा बांधण्यात आलीय. या वेळी महापौर स्नेहल आंबेकर यांनी आम्ही पाच वर्षांत केलेली काम दाखवायची वेळ आल्याचं म्हटलंय. युती होणार की नाही या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या की, 'हा निर्णय सर्वस्वी उद्धव ठाकरे घेतील'.

Loading Comments