SHARE

मुंबई - भाजपाचे मुंबईच्या विकासंदर्भातील व्हिजन शिवसेनेला मान्य असेल तरच आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये युती होणं शक्य आहे, असं सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. या वेळी फडणवीस यांनी महापालिकेतील गैरकारभाराबद्दल नाराजीही दर्शवली. विधानसभा निवडणुकीच्यावेळी मुंबईत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या वाढलेल्या ताकदीचा उल्लेख केला. भाजपाची वाढलेली ताकद आणि भाजपाचे मुंबईच्या विकासासाठीचे व्हिजन हे जर शिवसेनेला मान्य असेल, तरच युती शक्य होईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

तसंच एमएमआरडीएचे बजेट कमी असून त्यांच्याकडून जास्त विकासकामं केली जातात. मात्र मुंबई महापालिकेचं बजेट जास्त असूनही काहीच कामं होत नसल्याचा आरोपही फडणवीसांनी केला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या