Advertisement

शिवाजी पार्क येथे हजारो भीमसैनिकांची उपस्थिती


शिवाजी पार्क येथे हजारो भीमसैनिकांची उपस्थिती
SHARES

दादर - 6 डिसेंबरला होणाऱ्या 60 व्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून चैत्यभूमीला दर्शनासाठी येणा-या आंबेडकर अनुयायांनी 4 डिसेंबरपासूनच शिवाजी पार्क परिसरात हजारोंच्या संख्येनं गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतय. महत्त्वाची बाब म्हणजे शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भिमसैनिक दरवर्षी हजेरी लावतात. गतवर्षीच्या तुलनेत महापालिकेने मुलबक प्रमाणात सोईसुविधा दिल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 5 डिसेंबरला सकाळपर्यंत हजारो भिमसैनिकांनी शिवाजी पार्क येथे उपस्थिती दर्शवली होती. या सर्व आंबेडकर अनुयायांना चैत्यभूमीचं दर्शन व्हावे यासाठी शिवाजी पार्क मधील बूथमध्ये 8-10 ठिकाणी लाइव्ह स्क्रिनिंगची सोय करण्यात आलीय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा