मोदीजी...मुंबई भाजपमधली घराणेशाही कशी थांबवाल?

    मुंबई  -  

    अंधेरी - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वीच 56 इंचाची छाती ताणून घोषणा केली होती की भाजपा घराणेशाही मोडून काढेल. पण,  भाजपाची मुंबई पालिका निवडणुकीची उमेदवारांची यादी मोदींनी पाहिली तर कदाचित त्यांच्यावर ही घोषणा जाहीररित्या मागे घेण्याचीच नामुष्की ओढवेल आणि आता तर विरोधकांसोबत भाजपच्याच कार्यकर्त्यांनी याबद्दल जाहीररित्या नाराजी व्यक्त केली आहे. अंधेरी मतदार संघात भाजपाकडून वॉर्ड क्र. 68 मधून आमदार अमित साटम यांचे मेहुणे रोहन राठोड यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे पक्षासाठी अनेक वर्ष निष्ठेनं काम करणारे कार्यकर्ते नाराज झालेत. रोहन राठोड यांनी मात्र फुलचंद उबाळेंचे आरोप फेटाळलेत. ​आजपर्यंत काँग्रेसवर घराणेशाहीचे आरोप करणाऱ्या भाजपमध्येच आता घराणेशाही मूळ धरताना पहायला मिळतेय. अंधेरीच्या निमित्ताने पक्षांतर्गत नाराजीही समोर आली. मात्र,  या सर्व प्रकारामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपनं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत दिलंय हे नक्की.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.