Advertisement

अमित ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अमित ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज
SHARES

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना लिलावतीत दाखल करण्यात आले होते. आता त्यांना घरीच क्वॉरंटाईन राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

अमित ठाकरे यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना २० एप्रिल रोजी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाची लक्षणे कमी झाल्याने त्यांना चार दिवसातच डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, त्यांना १४ दिवस घरीच क्वॉरंटाईन राहावं लागणार आहे.

अमित ठाकरे हे मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सतत भेटत असतात. पक्षाच्या असंख्य कार्यक्रमांनाही हजेरी लावत असतात. कोरोनामुळे पक्षाचे कार्यक्रम बंद असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांशी भेटीगाठी होत होत्या.

अमित ठाकरे यांना सर्दी आणि ताप जाणवत होता. त्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. राज ठाकरेंच्या कुटुंबातील इतर कुणालाही कोरोनाची लक्षणे नाहीत. राज ठाकरेंच्या कुटुंबातील इतरांची चाचणी निगेटिव्ह आल्याचीही माहिती मिळाते आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा