Advertisement

महाराष्ट्र कुठेही नेला असो, पण बिहार...अमृता फडणवीसांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं

बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे.

महाराष्ट्र कुठेही नेला असो, पण बिहार...अमृता फडणवीसांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं
SHARES

बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी शिवसेनेचा शवसेना असा उल्लेख करून खिल्ली देखील उडवली आहे.

आपल्या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी लिहिलं आहे की, काय चाललंय तरी काय? शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारलं बिहारमध्ये! महाराष्ट्र कुठेही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबाबत धन्यवाद.

बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजपच्या एनडीएला १२५ निसटतं बहुमत मिळालं असून आरजेडी आणि काँग्रेसच्या महाआघाडीने जोरदार टक्कर देत ११० जागा मिळवल्या. परंतु या निवडणुकीत उतरलेल्या शिवसेनेचा पुरता धुव्वा उडाला आहे. शिवसेनेने या निवडणुकीत २२ उमेदवार उभे केले होते. या उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतं मिळाली असून सगळ्यांचं डिपाॅझिटही जप्त झालं आहे. 

हेही वाचा- “संजय राऊत महाराष्ट्रात शिवसेनेची अवस्था बिहारसारखी करतील”

यामुळे भाजप नेते स्वत:ची पाठ थोपटतानाच सध्या शिवसेनेवर तुटून पडले आहेत. संजय राऊत जोपर्यंत शिवसेनेत आहेत, तोपर्यंत विरोधकांना भीती नाही. कारण या निवडणुकीमध्ये शिवसेनेची बिहारमध्ये जी अवस्था केली तशीच शिवसेनेची अवस्था महाराष्ट्रात संजय राऊत करतील, असं म्हणत बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली होती. 

 काँगसने  महाराष्ट्रात "हातात" "धनुष्यबाण" धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला...असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे. महाराष्ट्रातसुद्धा जनतेच्या "घड्याळाचे" काय सांगावे टायमिंग...? असं म्हणत महाराष्ट्रातही सत्ताबदलाचे संकेत दिले आहेत. 

सोबतच भ्रष्टाचारी काँग्रेससोबत सलगी केलेलेल्या "जगंलराज का युवराज" ला बिहारच्या जनतेने नाकरलं.. महाराष्ट्रात पण भ्रष्टाचारी काँग्रेस सोबत "जंगलाचे बेगडी प्रेमी युवराज" युती करुन बसलेत. समजनेवाले को इशारा काफी है, असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं. 

(amruta fadnavis slams shiv sena over bihar assembly election result)

हेही वाचा- “काँगसने महाराष्ट्रात ‘हातात’ ‘धनुष्यबाण’ धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला”

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा