'मुख्यमंत्र्यांनी क्लिनचिट मंत्रालय सुरू करावं'

 Pali Hill
'मुख्यमंत्र्यांनी क्लिनचिट मंत्रालय सुरू करावं'
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - लाचलुचपत विभाग मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. तसेच मुख्यमंत्र्यांनी क्लिनचीट मंत्रालय सुरू करायला पाहिजे असा टोला लगावत कोणतीही चौकशी न करता क्लिनचीट दिल्याची टीका सचिन सावंत यांनी केलीय. या सगळ्याचा पाठपुरावा काँग्रेस करणार असल्याचंही ते यावेळी म्हणालेत. चिक्की घोटाळाप्रकरणी लाचलुचपत खात्यानं महिला आणि बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांना क्लिनचीट दिलीय यावर आता काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांना थेट टार्गेट केलं जातंय.

Loading Comments