विक्रोळी - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं 500 जणांना विनामूल्य अपघात विम्याचं कवच पुरवण्यात आलंय. ही विमा पॉलिसी एक लाख रुपयांची आहे. हा कार्यक्रम कन्नमवारनगर 2 येथील श्री गणेश मैदान सभागृहात गुरुवारी झाला. माजी खासदार संजय पाटील यांच्या पत्नी पल्लवी पाटील यांच्या हस्ते वाटपाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात विक्रोळी राष्ट्रवादीचे युवक तालुका अध्यक्ष सचिन बोकडे, राष्ट्रवादी युवक वॉर्ड अध्यक्ष नवनाथ भोर आणि तालुका सरचिटणीस अभिषेक आवटे आदीही उपस्थित होते.
