अनिल देसाईंची भाजपाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

 Mumbai
अनिल देसाईंची भाजपाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Mumbai  -  

मुंबई - शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी भाजपा विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे. "भाजपाने जाहिरातीमध्ये शिवाजी महाराज यांच्या चित्राचा वापर केला आहे. निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्षांनी राष्ट्रपुरुषांची छायाचित्रे वापरू नयेत असा नियम आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला आहे," असा आरोप अनिल देसाई यांनी केला आहे. "निवडणूक आयोगाने भाजपावर कारवाई करावी," अशी मागणीही अनिल देसाई यांनी केली आहे.

Loading Comments