शिवसेनेच्या रडारवर सीएम

मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलाय. अशातच शिवसेनेने थेट मुख्यमंत्र्यांवरच गंभीर आरोप केलाय. देवेंद्र फडणवीस महापौर असताना नागपूर महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. नंदलाल समितीने नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचारावर अहवाल सादर केला होता. त्यावेळचे महापौर आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशी अनियमितता केली याचे पुरावे या अहवालात असल्याचं सांगत अनिल परब यांनी भाजपाला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. शिवसेनेने केलेल्या आरोपांना भाजपानेही त्याच भाषेत उत्तर दिले. काँग्रेस आणि शिवसेनेमधील व्हॅलेण्टाईनचे पुरावे भाजपाने सादर केले आहेत. एकेकाळचे मित्र आज एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करत आहेत. त्यातून नक्की दोषी कोण आणि त्याला शिक्षा होईल का हा प्रश्न जरी असला तरी मुंबईकरांना मात्र त्यात शिवसेना-भाजपाच्या भ्रष्टाचाराचा पाढा ऐकायला मिळेल हे नक्की.

 

Loading Comments