पवार काका-पुतण्याचा 25 हजार कोटींचा घोटाळा - अण्णा हजारे

 Pali Hill
पवार काका-पुतण्याचा 25 हजार कोटींचा घोटाळा - अण्णा हजारे
पवार काका-पुतण्याचा 25 हजार कोटींचा घोटाळा - अण्णा हजारे
See all

मुंबई - राजकीय नेत्यांनी सहकारी साखर कारखाने डबघाईला आणत त्यांची कवडीमोल भावाने विक्री केली. तसेच सरकारी तिजोरीतील तब्बल 25 हजार कोटी रुपयांचं नुकसान करत राज्यावरील कर्जाचा बोजा एक लाख कोटी रुपयांहून वाढवला असं सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. याचिकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह बड्या नेत्यांना थेट प्रतिवादी करण्यात आले आहे . या नेत्यांनी कटकारस्थानाने हा संपूर्ण घोटाळा केला असा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे. हा खूप मोठा घोटाळा असून, याविषयी कॅगसह कित्येक समित्यांच्या अहवालांमध्ये परिस्थितीजन्य पुरावे आहेत. त्यामुळे त्याआधारे याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती करणारी फौजदारी जनहीत याचिकाच अण्णा हजारे यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर आणि अॅड. विनोद सांगवीकर यांच्यामार्फत केली आहे. या याचिकेवर शुक्रवार 6 जानेवारी रोजी न्या. अभय ओक आणि न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Loading Comments