वानखेडे मैदानातही 'CAA'चा विरोध

वानखेडेत एकिकडे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना सुरू होता. तर दुसरीकडे क्रिकेटप्रेमींना वानखेडेत वेगळाच सामना रंगलेला पाहायला मिळाला.

  • वानखेडे मैदानातही 'CAA'चा विरोध
  • वानखेडे मैदानातही 'CAA'चा विरोध
SHARE

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे सामना खेळला जात आहे. वानखेडेत एकिकडे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना सुरू होता. तर दुसरीकडे क्रिकेटप्रेमींना वानखेडेत वेगळाच सामना रंगलेला पाहायला मिळाला

सामना सुरू असताना काही तरूणांनी नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात आंदोलन केलं. आंदोलनकर्त्यांनी स्टेडियममध्ये सीएए आणि एनपीआर विरोधात असलेले टी शर्ट घातले होते. त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. स्टेडियममध्ये आंदोलन करण्यात आल्यानंतर याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसापासून विद्यार्थ्यांनी या विरोधात आंदोलन पुकारलं आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली नसल्याचं विद्यार्त्यांनी म्हटलं आहे. अखेर केंद्र सरकारच्या नागरिकत्व संशोधन कायदा CAA च्या विरोधातील आंदोलन क्रिकेटच्या मैदानात जाऊन पोहोचलं आहे. क्रिकेट सामना पाहायला पोहोचलेल्या या तरुणांनी नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात स्टेडियममध्ये आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.हेही वाचा

अभिनेत्रींनी मुंबईतच राहून नाचावं, भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

संबंधित विषय
ताज्या बातम्या