आर्ची-परश्या म्हणतात, चला मतदानाला!

 Pali Hill
आर्ची-परश्या म्हणतात, चला मतदानाला!
आर्ची-परश्या म्हणतात, चला मतदानाला!
See all

मुंबई - निवडणुकांच्या तोंडावर मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक आयोगाने नवी युक्ती शोधून काढली आहे. निवडणूक आयोगानं ‘सैराट’ चित्रपटातील आर्ची-परश्या अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. सैराटमधले आर्ची आणि परश्या पुन्हा एकदा फोटो आणि बॅनरवर झळकणार आहेत. मात्र या वेळी निमित्त चित्रपटाचं नसून निवडणुकीचं आहे. आगामी निवडणुकांमध्ये मतदान करण्याचं आवाहन आर्ची-परश्या मतदारांना करणार आहेत. मतदान मोठ्या प्रमाणात होत नाही. कित्येक वेळा मतदान करण्यासाठी मतदार पुढे येत नाही. त्यातही युवा वर्ग मतदानांच्या दिवशी सुट्टीचा फायदा घेऊन एक दिवसाची पिकनिक करतात. त्यासाठी निवडणूक आयोगानं ही नवी शक्कल लढवलीय.

Loading Comments