आमदारांचा निवास 'फाईव्ह स्टार' होणार


  • आमदारांचा निवास 'फाईव्ह स्टार' होणार
SHARE

राज्यातल्या कुठल्याही विधानसभा क्षेत्राचा आमदार असो मुंबईतील त्याच्या हक्काचं राहण्याचं ठिकाण म्हणजे 'मनोरा आमदार निवास'. आतापर्यंत इथं केवळ जुनाट स्ट्रक्चर, कोंदट वातावरणाचा अनुभव घेणाऱ्या आमदारांना लवकरच 'फाईव्ह स्टार' हॉटेलच्या सुविधा घेता येणार आहेत. कारण पडझड झालेल्या जुन्या आमदार निवासाचं रुपडं पालटून तिथं सेंट्रल एसी, जिम, कॅफेटेरिया अशा एक ना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.


प्रस्तावित आराखड्याचं सादरीकरण

मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणी उच्चाधिकार समितीसमोर विधिमंडळात प्रस्तावित इमारतीच्या आराखड्याच नुकतंच सादरीकरण करण्यात आलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यानी या सूचना केल्या. प्रस्तावित आमदार निवास इमारतीच्या या आराखड्याचं सादरीकरण वास्तूविशारद शशी प्रभू यांनी केलं.'अशा' असतील सुविधा

'मनोरा आमदार निवासा'च्या सध्याच्या जागेवर २ नवीन इमारती उभारण्यात येणार आहेत. त्यात आमदारांसाठी खोल्या, वाहनतळाची व्यवस्था, कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था, जिम, कॅफेटेरिया, तिकिट बुकिंगची सोय, दुकान आदींचा आवश्यक बाबींचा समावेश असणार आहे. शिवाय नवी इमारत सेंट्रलाईज्ड एसी आणि वायफाय सुविधांनी सुसज्ज असेल.


मुख्यमंत्र्यांची सूचना

यावेळी मुख्यमंत्र्यानी नवीन इमारत स्मार्ट व ग्रीन संकल्पनेवर आधारित असावी, इमारतीचं बांधकाम झटपट होण्यासाठी कोरियन तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसंच आमदार व कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून आवश्यक सोयी सुविधांचा अंतर्भाव इमारतीत करावा, अशा सूचना केल्या.हेही वाचा-

मनोरा आमदार निवास जमीनदोस्त करणारसंबंधित विषय
ताज्या बातम्या