मनोरा आमदार निवास जमीनदोस्त करणार


SHARE

मनोरा आमदार निवास येथे नवीन आमदार निवासाची इमारत बांधण्यासाठी सध्याची इमारत पाडण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या १ फेब्रुवारीपासून मनोरा आमदार निवासातील कक्ष रिकामे करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मनोरा आमदार निवास पुनर्बांधणी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.


एनबीसीसी करणार पुनर्बांधणी

मनोरा आमदार निवास पुनर्बांधणीसंदर्भात उच्चाधिकार समितीची बैठक समिती प्रमुख व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. निवासाची पुनर्बांधणी नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनच्या (एनबीसीसी)मार्फत करण्यात येणार आहे. पुनर्बांधणीसाठी पर्यावरण विषयक व इतर विविध परवान्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एनबीसीसीला सहकार्य करावे व लवकरात लवकर परवाने मिळवून द्यावेत, असे निर्देश यावेळी समितीच्या वतीने देण्यात आले.


1 तारखेपासून वीज-पाणी पुरवठा बंद

बांधकाम लवकर सुरू करण्यासाठी १ फेब्रुवारीपासून आमदार निवासातील कक्ष रिकामे करावेत व तेथील वीज व पाणी पुरवठा खंडित करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचे काम कमी कालावधीत व्हावे, यासाठी वेगाने प्रक्रिया कराव्यात. तसेच, या बांधकामासाठी जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.हेही वाचा

'मनोरा' प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

25 वर्षांच्या आतच आमदारांचा मनोरा ढासळतोय!


संबंधित विषय
ताज्या बातम्या