'मनोरा' प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार


  • 'मनोरा' प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार
SHARE

मुंबईतील मनोरा आमदार निवासातील खोली दुरूस्तीच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली. औचित्याच्या मुद्द्यावर भाजपा आमदार चरणसिंग वाघमारे यांनी मनोरा आमदार निवासातील ३० आमदारांच्या खोल्यांची दुरुस्ती न करता दुरुस्तीची बिले काढण्यात आल्याचा औचित्याचा मुद्दा सभागृहात मांडला. त्याला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.


मुंबईतील मनोरा अामदार निवासस्थान येथे खोली दुरुस्तीच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून सरकारची फसवणूक केली अाहे. अामदाराच्या रूममध्ये कोणतीही दुरूस्ती न करता लाखो रुपायांची बिले सरकारला सादर केली. याला जबाबदार असणाऱ्या संबधीत अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून मोक्का अंर्तगत कारवाई करण्याची मागणी सभागृहात केली.

- चरणसिंग वाघमारे, भाजपा आमदारअहवाल आल्यावर कारवाई

या सगळ्या विषयाची चौकशी करून दोघांना बडतर्फ केलं आहे. अजून चौकशी सुरू असून संपूर्ण अहवाल आला की कारवाई करू, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.


नेमकं काय आहे प्रकरण?

धोकादायक मनोर आमदार निवास लवकरच पाडण्यात येणार आहे. मात्र मनोरा आमदार निवासातील 'बी' विंगमध्ये, १२ व्या मजल्यावरील खोली क्रमांक १२१ आणि १२५ यथे दुरुस्थीचं काम करण्यात आल्याचं समोर आलं होतं. इमारतीच्या १२ व्या मजल्यावर नूतनीकरणाच्या कामासाठी नव्या टाईल्स आणि सिमेंटची पोती ठेवण्यात आली होती. यातल्या एका खोलीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार राहुल नार्वेकर, तर दुसऱ्या खोलीमध्ये बळीराम शिरसकर हे राहतात. विशेष म्हणजे नियमानुसार मनोरा आमदार निवास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे या इमारतीत बांधकाम खात्याच्या परवानगी शिवाय नूतनीकरणच काय पण, दुरुस्तीचं कामही करता येत नाही. त्यामुळे या इमारतीत नूतनीकरण करण्याची परवानगी कोणत्या अधिकाऱ्याने दिली? असा सवाल त्यावेळी विचारण्यात आला.हेही वाचा-

25 वर्षांच्या आतच आमदारांचा मनोरा ढासळतोय!

'आदर्श' प्रकरणी अशोक चव्हाणांना मोठा दिलासा


संबंधित विषय
ताज्या बातम्या