Advertisement

25 वर्षांच्या आतच आमदारांचा मनोरा ढासळतोय!


25 वर्षांच्या आतच आमदारांचा मनोरा ढासळतोय!
SHARES

एकीकडे घाटकोपरमध्ये इमारत कोसळण्याची घटना ताजी असतानाच आता मुंबईतल्या नरिमन पॉइंट येथील मनोरा आमदार निवासातील एका खोलीचे छत कोसळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जळगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्या खोली क्रमांक 125 मध्ये घडली.

म्हणून बचावले सतीश पाटील -

शनिवार, रविवार असल्यामुळे अधिवेशनाला सुट्टी होती. त्यामुळे सतीश पाटील हे गावी गेले होते. जेव्हा ते सोमवारी सकाळी अधिवेशनासाठी आपल्या खोलीवर आले, तेव्हा त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला. विशेष म्हणजे सतीश पाटील यांच्या चेंबरमधील पीओपीसहित छताचा बराच मोठा भाग त्यांच्या बेडवर पडला. त्याच खोलीतील पंखादेखील तुटून खाली पडला. यामुळे भिंतीला देखील तडे गेले आहेत.



अधिवेशन सुरू असते तर, मोठी दुर्घटना घडली असती. सरकारच्या अनास्थेमुळे असे प्रकार घडत असून, याबाबत विधानसभेत आवाज उठवणार.
- सतीश पाटील, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस


25 वर्षांत आमदार निवासाची दैना

दक्षिण मुंबई परिसरात असलेल्या आमदारांच्या हक्काच्या निवासस्थानाला अवघी 25 वर्ष झाली आहेत. या आमदार निवासाचे वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यावेळी ही इमारत धोकादायक असल्याची माहिती समोर आली होती. या आमदार निवासाची अवस्था अत्यंत दयनीय झालेली असताना आमदारांना जीव मुठीत धरून येथेच राहावे लागत आहे. त्यामुळे आमदारांच्या निवासाची व्यवस्था करावी अशी मागणी आमदार करत आहेत.


'आमदारांना आदर्शमध्ये स्थलांतरीत करा'

आमदारांना राहायला घर नाही आणि आदर्श इमारत तयार आहे. त्यामुळे आमदारांना आदर्शमध्ये स्थलांतरीत करावे, अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी देखील केली आहे.


जर 300 अामदारांकरीता भाड्याने जागा घेतल्या तर, दोन वर्षांचा खर्च 100 कोटी होईल. यामुळे सर्व अामदारांना एकसारखी जागा मिळणार नाही. तसेच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार. अार्दश इमारत जी गेल्या अाठ वर्षांपासून बंद अाहे. ती इमारत आमदारांना वापरण्यास दयावी.
- अनिल गोटे, आमदार, भाजपा



मनोरा आमदार निवासाची अवस्था वाईट आहे. माझ्यादेखील खोलीची अवस्था अत्यंत वाईट आहे. याबद्दल अनेकदा तक्रार केली होती. सरकारने आमदारांच्या निवासाची व्यवस्था करावी.
- प्रकाश सुर्वे, आमदार, शिवसेना



हेही वाचा -

...आणि आमदार आंघोळ न करताच आले विधानसभेत!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा