Advertisement

...आणि आमदार आंघोळ न करताच आले विधानसभेत!


...आणि आमदार आंघोळ न करताच आले विधानसभेत!
SHARES

मुंबई -  विधानसभेत जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकांवर आंघोळ न करताच विधानसभेत जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जनतेच्या समस्या मांडणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या पीएंची ही अवस्था असेल तर मुंबई राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचं काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

शनिवारी सकाळी मनोरा आमदार निवासमध्ये पाणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे आमदार आणि त्यांच्या पीएंंची चांगलीच तारांबळ उडाली. याबाबतची पूर्वकल्पना मनोरा निवासमध्ये राहणाऱ्या आमदारांना, पीएंना देण्यात आली नव्हती. त्यामुळे अधिवेशनामध्ये पोहोचण्याची घाई आणि पाणी टंचाई अशी कसरत त्यांना करावी लागली. 

मनोरा आमदार निवासातील पाणी संपल्याने आंघोळ न करताच विधानसभेच्या पवित्र सभागृहात यावे लागले. मनोरा आमदार निवासाच्या समुद्राकडील बाजूच्या झोपडपट्टीत लोक उघड्यावर शौचास बसतात. त्यामुळे हा परिसर हागणदारी मुक्त करावा 

- हेमंत पाटील, शिवसेना आमदार

याबाबत मनोरा अामदार निवासाच्या प्रशासनाकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, टाकीमध्ये पाण्याची पातळी कमी असल्यामुळे पाण्याची कमतरता होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा