Advertisement

Live - अटल बिहारी वाजपेयींच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार


SHARES

माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचं गुरुवारी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी निधन झालं. नवी दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाजपेयी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दिल्लीतील राष्ट्रीय स्मृतीस्थळावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

केंद्र सरकारने २२ ऑगस्टपर्यंत राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. विविध पक्षांचे नेते, भाजप कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा