बलात्कार प्रकरणी 'त्या' आमदारालाही आरोपी करा

 Vidhan Bhavan
बलात्कार प्रकरणी 'त्या' आमदारालाही आरोपी करा

नरिमन पॉइंट - आमदार निवास बलात्कार प्रकरण पेटण्याची शक्यता आहे. या प्रकरणात महेश्वर कदम याला अटक झाली आहे. पण नांदेडमधील नायगावचे आमदार वसंतराव चव्हाण यांना देखील या प्रकरणात आरोपी करण्याची मागणी केली आहे.

आमदार निवासात ज्या ९३ क या खोलीत हा प्रकार घडला ती खोली आमदार वसंतराव चव्हाण यांना देण्यात आली होती. याच खोलीत सहा वेळा महेश्वर कदम नावाच्या इसमाने लग्नाचे आमिष दाखवून १८ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केला. "सप्टेंबर २०१५ ला जेव्हा पहिल्यांदा महेश्वरने या मुलीला आमदार निवासात नेले तेव्हा तेथील सुरक्षारक्षकांनी मुलीचे वय बघून तिला आत सोडण्यात मज्जाव केला होता. मात्र तेव्हा आमदार वसंतराव चव्हाणांच्या मध्यस्थीनंतर महेश्वर, पीडित मुलगी आणि इतर दोघांना आत सोडण्यात आले," म्हणूनच या संपूर्ण प्रकरणात आमदाराही दोषी असल्याचा आरोप युनायटेड काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केला आहे.

Loading Comments