सावरकर स्मारकाच्या अध्यक्षपदी अरूण जोशी

 Dadar
सावरकर स्मारकाच्या अध्यक्षपदी अरूण जोशी

दादर - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी अरूण जोशी यांची सलग सातव्यांदा निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदाचा भार सावरकरांचे नातू रणजित सावरकर सांभाळणार आहेत. स्मारकाच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत निवडणूक अधिकारी राजेंद्र वराडकर यांनी ही घोषणा केली. अरूण जोशी यांनी त्यांच्या कार्यकाळात स्मारकाच्या दृष्टीनं धडाडीची कार्य केली आहेत. अद्ययावत अशा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाची निर्मिती, पोर्ट ब्लेअरच्या विमानतळावर स्वा. सावरकरांच्या पुतळ्याची स्थापना, सावरकारांच्या निवडक ग्रंथ संपदेचे 12 प्रांतिक भाषांमध्ये भाषांतर हे त्यांच्या कारकीर्दीचे ठळक प्रकल्प आहेत. देशभरात सावरकारांचे कृतिशील अनुयायी वाढवणे ही या मागची जोशी यांची संकल्पना आहे.

Loading Comments