Advertisement

मुंबई पोलिसांची MIM च्या बीकेसीतल्या रॅलीला परवानगी नाही

मुंबई पोलिसांनी मंगळवारी, २३ नोव्हेंबर २०२१ रोजी परवानगी नाकारली.

मुंबई पोलिसांची MIM च्या बीकेसीतल्या रॅलीला परवानगी नाही
SHARES

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी अलीकडेच मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) इथं रॅली काढण्याची परवानगी मागितली. तथापि, मुंबई पोलिसांनी मंगळवारी, २३ नोव्हेंबर २०२१ रोजी परवानगी नाकारली.

याबाबतची माहिती मुंबई पोलिसांनी शेअर केली होती आणि निवेदनात असं लिहिलं आहे की, "एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील बीकेसी इथं रॅली काढण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

कोविड-19,मुळे एका जागी गर्दी करण्यावर बंदी असल्यानं ही परवानगी देण्यात आली नाही. यासोबतच एमएमआरडीए मैदानावरील मेळावे आणि राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नुकताच झालेला हिंसाचार यामुळे देखील रॅलीला परवानगी देण्यात आली नसावी

अहवालानुसार, २७ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मैदानावर मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते. ओवेसी, त्यांचे बंधू अकबर ओवेसी, खासदार आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष इम्तियाज जलील जनसमुदायाला संबोधित करणार होते.

केंद्र सरकारनं कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर ओवेसी यांनी त्यांचे मत मांडले. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी अधिक सामायिक करताना, त्यांनी सरकारला नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) मागे घेण्याची मागणी केली, असं न झाल्यास पक्ष निषेध करेल, असा इशाराही त्यांनी दिला होता.हेही वाचा

देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’वर

CM सहायता निधीतील ६०६.३ कोटी विनावापर पडून, RTIमधून उघड

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा