मलिक यांच्यावर खटला भरणार - शेलार

 Pali Hill
मलिक यांच्यावर खटला भरणार - शेलार
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचं ट्विट भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी केलंय. नवाब मलिक यांनी रियाज भाटी यांच्यासंदर्भात एका पत्रकार परिषदेत भाजपावर आरोप केले होते. रियाज भाटी डी कंपनीशी संबधित आहेत आणि तरीही त्यांना भाजपानं प्रवेश दिलाय, असं मलिक म्हणाले होते. त्यावरून शेलार आणि नवाब मलिक यांच्यात ट्विटरवॉर सुरू झालंय.

काय म्हणाले शेलार ट्विटमध्ये

“रियाज भाटी भाजपाच्या जुन्या कार्यकारणीतही नव्हता. नविन कार्यकारणी झालेली नाही. त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही. मलिकांचे आरोप धादांत खोटे. मी नवाब मलिकांवर मानहानीची केस करणार आहेच. शिवाय मीच पोलिस आयुक्तांना फोन करून रियाज भाटी प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. मलिक यांनाच गँग आणि टोळ्यांची गरज निवडणुकीत भासत असेल. त्यांना स्मृतीभ्रंश झालाय. जुनं काहीतरी आठवतंय. त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे.”

Loading Comments