Advertisement

अश्विनी भिडे यांना प्रधान सचिवपदी बढती

मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांना प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे.

अश्विनी भिडे यांना प्रधान सचिवपदी बढती
SHARES

मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांना प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. आरे येथील मेट्रो-3 च्या कारशेडच्या मुद्द्यावरून अश्विनी भिडे आणि शिवसेना यांच्यात तीव्र मतभेद झाले होते. त्यामुळे सत्ता आल्यानंतर  अश्विनी भिडे यांची बदली होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, राज्य सरकारने अश्विनी भिडे यांना पदोन्नती दिली आहे.

अश्विनी भिडे यांच्याकडे मेट्रोची जबाबदारीही कायम असणार आहे. आरेतील मेट्रोच्या कारशेडच्या बांधकामासाठी रात्रीच्या वेळी झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्यामुळे आरेत मोठं आंदोलन झालं होतं. यावेळी  मेट्रो-३ च्या संचालक असलेल्या अश्विनी भिडे यांना शिवसेनेने टीकेचे लक्ष्य केले होते. या आंदोलनाला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता.  आरे येथील कारशेड अन्यत्र हलविल्यास प्रकल्पच होणार नसल्याची भूमिका मेट्रो प्रशासनाने घेतली होती.  त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी अश्विनी भिडेंवर जोरदार टीका केली होती.'

अश्विनी भिडे आणि आदित्य ठाकरे यांच्यात ट्विटर वॉरही सुरू झाले होते. अश्विनी भिडे व अधिकाऱ्यांना आरेच्या कारशेडशिवाय मेट्रो प्रकल्प पूर्ण करता येणार नसेल तर अशा अधिकाऱ्यांना बाजूला करावे. त्यांच्या जागी सक्षम व मुंबईकरांना विश्वासात घेऊन काम करणाऱ्यांकडे प्रकल्प द्यावा, अशी मागणीही आदित्य यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अश्विनी भिडे यांची बदली होईल असा अनेकांचा अंदाज होता. 



हेही वाचा -

म्हणून शपथविधीला गेलो नाही - संजय राऊत

उद्धवा अजब तुझे सरकार- किरीट सोमय्या




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा