प्रभाग 201 मध्ये तिरंगी लढत

  Mumbai
  प्रभाग 201 मध्ये तिरंगी लढत
  मुंबई  -  

  वडाळा - प्रभाग क्रमांक 200 हा परळ एफ-दक्षिण विभागाशी जोडला गेला आहे. या प्रभागात काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक सुनील मोरे यांचा दबदबा आहे. मात्र प्रभाग 200 हा एससी महिला प्रवर्ग आरक्षित झाल्याने मोरे यांचा पत्ता आपसूकच या प्रभागातून कट झाला असून, त्यांच्या पत्नीलाही येथून उमेदवारी लढविणे शक्य नाही. परंतू आमदार कालिदास कोळंबकर यांचा उजवा हात म्हणून मोरे परिसरात परिचित असून, कोळंबकर यांच्या सोबत गेल्या 25 वर्षांपासून एकनिष्ठ कार्य करीत आहेत.

  मोरे यांनी 2008 ची निवडणूक लढवून प्रभाग 196 मधून उमेदवारी जिंकली होती. यंदा हा प्रभाग नव्याने 201 झाला असून, सर्वसामान्य महिला आरक्षित आहे. त्यामुळे या प्रभागातून पत्नी सुप्रिया मोरे हिला तिकीट मिळावे यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. मात्र प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवार माधुरी मांजरेकर यांनी सदरील प्रभागात विकासाची कामे करण्यास सुरुवात केली आहे तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या शर्वरी हेमंत सावंत यांनीही छुप्या प्रचाराला सुरुवात केल्याने येथे काँग्रेसच्या नगरसेविका पल्लवी मुणगेकर असतानाही प्रतिस्पर्धींच्या कामामुळे तसेच अंतर्गत प्रचारामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने कोणासही उमेदवारी मिळाली तरी या तिरंगी लढतीत कोण बाजी मारते ते उत्सुकता वाढवणारे असेल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.