'बॅट', 'गॅस सिलेंडर', 'रिक्षा' आणि काहींना 'माईक' ही मतदान चिन्हे (symbol) यावेळच्या विधानसभा निवडणुकीत (maharashtra vidhan sabha election) उभ्या असलेल्या विविध अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेली आहेत.
वर्सोवा मतदारसंघातील ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार (candidates) राजू पेडणेकर यांना रिक्षा चिन्ह मिळाले आहे. तर शिवडी येथील भाजपचे बंडखोर उमेदवार नाना आंबोळे यांना ‘बॅट’ चिन्ह देण्यात आले आहे.
यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन गट अनेक ठिकाणी आमनेसामने असल्याचे दिसून येत आहेत. शिंदे शिवसेनेचे निवडणूक (election) चिन्ह 'धनुष्यबाण' आणि ठाकरे शिवसेनेचे चिन्ह 'मशाल' अशी काही ठिकाणी लढत होणार आहे. त्यात मनसेनेही उमेदवार उभे केले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई (mumbai) शहर आणि उपनगरातील 36 मतदारसंघांसाठी 420 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये शहरातील 10 मतदारसंघात 105 तर पूर्व आणि पश्चिम उपनगरातील 26 मतदारसंघात 315 उमेदवार रिंगणात आहेत.
सर्वच ठिकाणी महाविकास आघाडी (maha vikas agahdi) आणि महायुती (mahayuti) यांच्यातच लढत आहे. यामध्ये धनुष्यबाण, मशाल, कमळ, हात, रेल्वे इंजिन ही प्रमुख पक्षांची चिन्हे आहेत. तसेच 'हत्ती' हे बहुजन समाज पक्षाचे चिन्ह आहे, तर वंचित बहुजन आघाडीला 'गॅस' सिलिंडरचे चिन्ह देण्यात आले आहे.
निवडणूक चिन्हांमध्ये एअर कंडिशनर (एसी), विजेचे खांब, हंडी, बॅटरी टॉर्च, शिट्टी, दूरचित्रवाणी संच, चालण्याची काठी, रिक्षा, बासरी, काच, किटली या वस्तूंचा समावेश आहे.
वर्सोवा मतदारसंघात राजू पेडणेकर यांना 'रिक्षा' तर शिवडीचे नाना आंबोळे यांना बॅटचे चिन्ह देण्यात आले आहे. हे बंडखोर उमेदवार अपक्ष म्हणून उभे असल्याने या दोघांनाही पक्षाचा पाठिंबा मिळणार नाही.
त्यामुळे हे चिन्ह प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही राजुल पटेल यांनी 'रिक्षा' या निवडणूक चिन्हावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि 32 हजार मते मिळवली.
हेही वाचा