मराठा मोर्चाने झाकोळली स्वातंत्र्य संग्रामाची ज्योत

  Mumbai
  मराठा मोर्चाने झाकोळली स्वातंत्र्य संग्रामाची ज्योत
  मुंबई  -  

  मुंबईत एरवी ९ ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. ऑगस्ट क्रांती मैदानात स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली जाते. परंतु मराठा मोर्चाच्या गर्दीत ऑगस्ट क्रांती दिनाचा विसरच मुंबईकरांना पडला.

  काँग्रेसकडूनही नेहमी भव्यदिव्यपणे साजरा होणारा क्रांती दिनाचा कार्यक्रम यंदा मोर्चाच्या भीतीने अत्यंत छोटेखानी पद्धतीने उरकण्यात आला.


  इथेच पेटली ठिणगी...

  मुंबईत भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी ‘छोडो भारत’ची गर्जना करत ‘करेंगे या मरेंगे’ हा दिलेला मंत्र ९ ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला. त्यामुळे या दिवशी जणू क्रांतीची ज्योतच पेटली आणि देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरुवात झाली.

  त्यामुळे ९ ऑगस्ट हा क्रांतीदिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात जाऊन स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झालेल्या शहिदांना काँग्रससह इतर पक्षांच्यावतीने श्रद्धांजली वाहिली जाते.


  काँग्रेसकडून मोठ्या कार्यक्रमाची तयारी पण...

  या क्रांती दिनाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे काँग्रेसने सुरूवातीला भव्यदिव्य कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी प्रत्येक नगरसेवक, पदाधिकारी यांना ऑगस्ट क्रांती मैदानात मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.

  परंतु मराठा मोर्चातील गर्दी लक्षात आल्यानंतर मुंबई काँग्रेसने सकाळी साडे नऊ वाजताच हा कार्यक्रम उरकून घेतला. या कार्यक्रमाला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदींसह काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

  काँग्रेसने हा कार्यक्रम साजरा केला असला तरी मुंबईभर स्वातंत्र्य संग्रामाची ज्योत ज्या क्रांती दिनी पेटली त्या दिनाऐवजी केवळ चर्चा होती ती मराठा क्रांती मोर्चाचीच.  हे देखील वाचा -

  मुंबईतून झाली 'ऑगस्ट क्रांती'ची सुरुवात!  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.