Advertisement

मी राजसाहेबांना दैवत का म्हणतो याची प्रचिती पुन्हा आली - अविनाश जाधव

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून, ते सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारं राज ठाकरे यांच एक नवं रुप पाहायला मिळालं.

मी राजसाहेबांना दैवत का म्हणतो याची प्रचिती पुन्हा आली - अविनाश जाधव
SHARES

येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून, ते सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारं राज ठाकरे यांच एक नवं रुप पाहायला मिळालं. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये मनसेच्या कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण आणि काही पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर गेले होते. याठिकाणी सहज बोलता बोलता मनोज चव्हाण यांनी आज खांदा खूप दुखतोय साहेब असं म्हटलं. त्यावर राज ठाकरेंनी थांब जरा, म्हणत सहकाऱ्याकडून मलम मागवत मनोज चव्हाण यांच्या खांद्यावर स्वत: हातानं ते लावलं.


राज ठाकरे यांनी मोजक्या शाखाध्यक्ष, कार्यकर्त्यांच्या घरी हजेरी लावत त्यांच्या कुटुंबाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. शिवाय, मनसे पदाधिकाऱ्यांच्या घरातलं कुणी निधन पावलं असेल तर राज ठाकरेंनी आर्वुजून त्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला.

या व्हिडीओवर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मी राजसाहेबांना दैवत का म्हणतो याची प्रचिती पुन्हा एकदा आल्याचं म्हटलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा