समाजवादी पक्षाकडून महाजनसभेचं आयोजन

 Mazagaon
समाजवादी पक्षाकडून महाजनसभेचं आयोजन
समाजवादी पक्षाकडून महाजनसभेचं आयोजन
समाजवादी पक्षाकडून महाजनसभेचं आयोजन
See all

भायखळा - नागपाडा जंक्शन येथे समाजवादी पक्षाच्या वतीनं महाजनसभा घेण्यात आली. या सभेत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी जनसमूहाला संबोधित केलं. या सभेला समाजवादी पक्षाचे वॉर्ड क्रमांक 211, 212, 213 या प्रभागाचे इच्छुक उमेदवार असलेले रइस शेख, रुकसाना सईद आणि वसीम सय्यद उपस्थित होते. या सभेत समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश अबू आझमी यांनी दिले. या सभेत अबू आझमी यांनी नाव न घेता मुस्लिम बांधवांच्या नावावर मत मागणाऱ्यांना तुम्ही आश्वासनं देण्यापलीकडे मुस्लिम बांधावांसाठी केलं काय आहे, असा सवाल करत ओवेसी यांना टोला लगावला. या वेळी समाजवादी पक्षाने मुंबईत केलेल्या विकासकामांची व्हीडीओ क्लिप दाखवण्यात आली. त्याचसोबत विकासाचा आरखडाही मांडला. या जनसभेला मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.

Loading Comments