Advertisement

काँग्रेसच्या कल्याण-डोंबिवली सरचिटणीसपदी बी. शामराव यांची नियुक्ती

कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ते आणि सक्षम भारत संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक बी. शामराव यांची गुरूवारी काँग्रेस पक्षाच्या कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या कल्याण-डोंबिवली सरचिटणीसपदी बी. शामराव यांची नियुक्ती
SHARES

कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ते आणि सक्षम भारत संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक बी. शामराव यांची गुरूवारी काँग्रेस पक्षाच्या कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्याचे अध्यक्ष सचिन पोटे यांनी पक्ष कार्यालयात त्यांना नियुक्तीपत्र दिलं.

पक्षश्रेष्ठींनी विश्वास ठेवून कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती केल्याबद्दल बी. शामराव यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे, राज्य सरचिटणीस मोहन जोशी, विधानपरिषद आमदार संजय दत्त, शहर जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांचे तसंच कार्यकर्त्यांचे आभार मानले. काँग्रेसकडे जनता आपला पक्ष म्हणून पाहते, त्यामुळे जनसामान्यांना काँग्रेसबद्दल नेहमीच ममत्व आहे. काँग्रेसच सर्वसामान्यांचा उद्धार करू शकते हा विश्वास त्यांच्यामध्ये आहे. जनतेचा हा विश्वास सार्थ ठरवत, कार्यकर्त्यांसोबत आगामी कल्याण डोंबिवली मनपा निवडणुकीमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहू, असा ठाम विश्वास यावेळी बी. शामराव यांनी व्यक्त केला.

कोरोना काळामध्ये सक्षम भारत आणि स्काय फाऊंडेशनच्या माध्यमातून ठाणे, कल्याण, डोंबिवलीमधील वाडीवस्त्यांपर्यंत जाऊन गरजूंना हरेक प्रकारे बी. शामराव यांनी मदत केली होती. त्यामुळे बी. शामराव यांच्यासारखा वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या एक उच्चशिक्षित, बुध्दीजिवी आणि तळमळीच्या कार्यकर्त्याला जिल्ह्याचं सरचिटणीसपद लाभल्याबद्दल जिल्ह्यातून त्यांचं कौतुक होत आहे.


हेही वाचा-

विधानसभा अध्यक्षपदावर शरद पवार यांचं मोठं विधान

विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी 'वर्षा'वर आघाडीच्या नेत्यांची बैठक


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा