Advertisement

विधानसभा अध्यक्षपदावर शरद पवार यांचं मोठं विधान

हे पद काँग्रेसकडेच राहील की शिवसेना वा राष्ट्रवादीकडूनही या पदावर दावा करण्यात येईल, याविषयी मध्यंतरी तर्कवितर्क लढवले जात होते.

विधानसभा अध्यक्षपदावर शरद पवार यांचं मोठं विधान
SHARES

महाराष्ट्रातील (maharashtra) विधानसभेचं अध्यक्षपद अद्याप रिक्तच असल्याने या पदासाठी तात्काळ निवडणूक घेण्यासाठी विरोधी पक्षाकडून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातच हे पद काँग्रेसकडेच राहील की शिवसेना (shiv sena) वा राष्ट्रवादीकडूनही या पदावर दावा करण्यात येईल, याविषयी मध्यंतरी तर्कवितर्क लढवले जात होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

यासंदर्भात भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदाची जागा ही काँग्रेसचीच (congress) आहे. मात्र या संदर्भात कोणताही निर्णय घ्यायचा असेल, तर महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही घटकपक्षांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. एकमताने विधानसभा अध्यक्षपदासाठी योग्य त्या उमेदवाराची निवड करावी.

याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाेबत कुठल्या विषयांवर चर्चा झाली? असा प्रश्न विचारला असता, त्यांनी सांगितलं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत आमची कुठल्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही. तर राज्यातील काही प्रश्नावर लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबत आमची चर्चा झाली. शिवाय पुढचा कार्यक्रम कसा करायचा यावर चर्चा झाली, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी 'वर्षा'वर आघाडीच्या नेत्यांची बैठक

शरद पवार मंगळवारी सायंकाळी वर्षा या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या निवासस्थानी गेले होती. त्यांच्यात सुमारे तासभर बैठक झाली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सुरू असलेली चौकशी व त्याबाबत राज्य सरकारची पुढील भूमिका याबाबतही चर्चा झाल्याचे तर्क लावण्यात आले.

त्यावर मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या (sharad pawar) भेटीतून वेगळे अर्थ काढण्याची काही गरज नाही. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमधील बैठक चांगली झाली. यावेळी रणनीतीवर चर्चा झाली असावी. विरोधी पक्षाकडून ज्या पद्धतीने हल्ले सुरु आहेत त्यातील अनेक हल्ले फुसके बार आहेत. पण एकत्रितपणे त्याचा प्रतिकार करणं गरजेचं आहे. जो भ्रम निर्माण केला जात आहे, आरोप केले जात आहेत त्यांना त्याच ताकदीने उत्तर देण्याची गरज मला वाटते. त्यासाठी मुंबईला गेल्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना भेटून काय करायचं हे ठरवणार आहे, असा खुलासा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा