Advertisement

मनसेच्या बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत मनसे आणि भाजपने एकत्र लढवली होती.

मनसेच्या बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
SHARES

मनसेचे नेते बाळा नांदगावकर (MNS leader Bala Nandgaonkar ) हे भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मंगळवारी म्हणजेच आज देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीआधी बाळा नांदगावकर हे फडणवीसांच्या भेटीला पोहोचले होते.

दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आशिष शेलार देखील आधीपासूनच उपस्थित होते. फडणवीसांची भेट घेऊन आल्यानंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला होता.

मी माझ्या वैयक्तिक कामासाठीच आलो होतो. फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. राज ठाकरे यांनीच फोन केला होता. त्यामुळे भेटण्यासाठी वेळ दिला होता. दोन राजकारणी एकत्र भेटले तर राजकीय चर्चा होते असते, असंही नांदगावकर म्हणाले.

तसंच, आर्यन खान अटक प्रकरणावरून अनेक आरोप प्रत्यारोप होत आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याची माहिती समोर आली आहे, हे योग्य नाही, असं मतही बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलं.

काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर मसने आणि भाजपमध्ये हालचालींना वेग आला. पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत मनसे आणि भाजपने एकत्र लढवली होती. त्यामुळे महापालिकाच्या निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्र येणार का अशी चर्चा रंगली आहे.



हेही वाचा

...अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी : चाकणकर

वाघनखं गमावलेल्या पक्षाचा 'राज्य सरकार पुरस्कृत' बंद मुंबई- महाराष्ट्रात अयशस्वी ठरला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा