शिवसेनेला 'मन'से युती हवी?

  Kalanagar
  शिवसेनेला 'मन'से युती हवी?
  मुंबई  -  

  वांद्रे - मनसेचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी रविवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना नेत्यांची भेट घेतली. या वेळी नांदगावकर शिवसेना-मनसे युतीबाबतचा प्रस्ताव घेऊन गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. बाळा नांदगावकर यांची भेट उद्धव ठाकरेंशी झाली नाही. मात्र शिवसेनेच्या इतर नेत्यांसोबत नांदगावकर यांची बोलणी झाली. त्यावेळी बाळा नांदगावकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा युतीचा प्रस्ताव दिल्याचे सांगितले जात आहे.

  शनिवारी पुण्यात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिवसेना-मनसे युती झाली तर इतिहास घडेल असे वक्तव्य केले होते. तर शनिवारीच भाजपाच्या विजय संकल्प सभेमध्ये आशिष शेलार यांनी शिवसेनेने वचननाम्यामध्ये स्मारकाचा उल्लेख केला नाही, कारण शिवसेना आणि मनसेमध्ये युतीची चर्चा सध्या सुरू आहे, असा गौप्यस्फोट केला होता. शिवसेना आणि मनसे युती जरी झाली तरी दोघांना जागा किती सोडाव्या लागतील यासाठीही कसरत करावी लागणार आहे. कारण शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षाचे गड दादर-माहीम आहेत. तसेच मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या इच्छुक उमेदवारांनी तिकिटे मिळण्यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. त्यामुळे ही दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी ठरू शकते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.