मुंबईत शिवसेनाप्रमुखांचा पूर्णाकृती पुतळा


मुंबईत शिवसेनाप्रमुखांचा पूर्णाकृती पुतळा
SHARES

मुंबई - पालिकेकडून मुंबईत लवकरच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी मागणी केली होती,की दक्षिण मुंबईतील महाराष्ट्र पोलीस  मुख्यालय इमारतीसमोर डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये बाळासाहेबांचा पुतळा उभारण्यात यावा. त्यासंबंधीचे पत्रही फणसे यांनी महापौर स्नेहल आंबेकर यांना दिले होते. त्यानुसार या मागणीवर गटनेत्यांच्या सभेत चर्चा झाली आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी ही मागणी मान्य केली.

संबंधित विषय