ईव्हीएम मशीनवर बंदी आणावी - अबू आझमी

 Mumbai
ईव्हीएम मशीनवर बंदी आणावी - अबू आझमी
Mumbai  -  

सीएसटी - जर्मन, पाकिस्तान, आयरलँड आधी देशात ईव्हीएम मशीनला बंदी आहे. 2013 ला सेशन कोर्टाने मशीनला स्लिप लावायला सांगितलं होते, त्याची अजून पूर्तता झालेली नाही. त्यामुळे त्याची चौकशी करून भारतातही ईव्हीएम मशीनवर बंदी आणली पाहिजे, अशी मागणी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू आझमी यांनी केलीय. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाराष्ट्रात महापालिका निवडणूकीत भाजपाविराेधी वातावरण असतानाही येथे भाजपाच वरचढ ठरला. उत्तरप्रदेशमध्येही तेच घडले. उत्तरप्रदेशमध्ये एकाही मुसलमान व्यक्तीला भाजपाने तिकीट दिलेली नाही. बॅलेट वोटींगला सपा पार्टी मोठी होती, पण ईव्हीएम मशिनमुळे भाजपा पक्ष मोठा झाला. या सर्व प्रकरणाची एसआयटी मार्फत संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आझमी यांनी या वेळी केली. समाजवादी पार्टीने भरपुर कामे केलेली आहेत. परंतू अशी कामे पूढे होणार की नाही याची शाश्वती नाही. ईव्हीएम मशिन बंद झाली पाहिजे आणि पुढील कुठल्याही मतदानाच्या वेळी मशिनचा वापर होता कामा नये असे ते म्हणाले.

Loading Comments