Advertisement

नोटांबदीच्या विरोधात काँग्रेसचं जनआक्रोश आंदोलन


नोटांबदीच्या विरोधात काँग्रेसचं जनआक्रोश आंदोलन
SHARES

मुंबई - मोदी सरकारने नोटाबंदीच्या नावाखाली शेतकरी आणि सर्वसामान्यांचा जो छळ सुरु केला आहे, त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशच्या वतीने महाराष्ट्रात राज्यभर येत्या 28 नोव्हेंबर रोजी जनआक्रोश आंदोलन केले जाणार आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्या सूचनेनुसार राज्यभरात जिल्हा, वॉर्ड जनआक्रोश दिन साजरा होणार असून यात आंदोलन आणि मोर्चे काढले जाणार आहेत. एकाच दिवशी संपूर्ण राज्यात जनआक्रोश करण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेसने घेतला असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
नोटाबंदीमुळे देशभरात आर्थिक अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा निर्णय काळ्या पैशाविरूद्धच्या लढाईचा एक भाग असल्याचा दावा सरकार करत असले तरी त्यामुळे सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले गेलेय. हा निर्णय पुरेशा तयारीविनाच राबवल्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात चलन तुटवडा निर्माण होऊन दैनंदिन व्यवहार बाधीत झाले आहेत. रब्बीची पेरणी, लग्नसराई, व्यापार-उदीम, वैद्यकीय उपचार आदी महत्वाची कामे अडचणीत आली आहेत. आंदोलनात काँग्रेस पक्षाचे प्रदेश आणि जिल्हा स्तरावरील नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व त्याचप्रमाणे युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयुआय, सेवा दल आदी संघटनात्मक आघाड्या सहभागी होणार असल्याचे सचिन सावंत यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा