निवडणुकीसाठी काहीपण...

 Lower Parel
निवडणुकीसाठी काहीपण...
निवडणुकीसाठी काहीपण...
निवडणुकीसाठी काहीपण...
निवडणुकीसाठी काहीपण...
निवडणुकीसाठी काहीपण...
See all
Lower Parel, Mumbai  -  

लोअर परळ - मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. कोणी लादीकरण करत आहेत, तर कोणी गटार दुरुस्ती. प्रभाग १९५ मध्ये शिवसेना नवीन पाण्याच्या टाक्या आणि पाइपलाइन असे नूतनीकरणाची कामे करत आहेत, तर मनसे बँकेच्या आणि एटीएमच्या रांगेत असलेल्यांना पाणी वाटप, बालदिन साजरा आणि जेष्ठ नागरिकांना ओळखपत्र देऊन मनसे आपली नवीन ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपा नेते आणि राष्ट्रवादी पक्षांनी अनेक गल्लीतल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र स्थानिक नागरिक हैराण झाले आहे. गेली साडे चार वर्ष जी कामे करण्यासाठी वाट पाहत होतो, आज तेच राजकीय पक्ष या दोन महिन्यात काम करत आहेत, असं रहिवासी अमित आब्रे यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला सांगितलं.

Loading Comments