निवडणूक जाहिराती बेस्ट उपक्रमासाठी फायदेशीर


SHARE

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीय उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. मतदारांनी प्रचंड मतांनी विजयी करावं यासाठी उमेदवार अनेक जाहीरातींच्या माध्यमातून मतदारांना प्रभावित करत आहेत. यामध्ये बेस्टच्या बसचा ही वापर करण्यात आला असून, बेस्टला जाहीरातीच्या माध्यमातून मोठा फायदा झाला आहे. 


बसवर जाहीरात

मुंबईतील विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं १०० आणि काँग्रेसनं २० बसवर जाहिरात लावल्या आहेत. बेस्ट बसवर जाहिरातींसाठी नेमलेल्या कंत्राटी एजन्सीच्या माध्यमातून या जाहिराती आल्या आहेत. बेस्टच्या बसवरील जाहिरातींसाठी सुमारे ४८ लाख रुपये खर्च मोजले आहेत.


४० लाख रुपये

बेस्टच्या प्रत्येक बसवरील जाहिरातीसाठी सुमारे ४० हजार रुपये इतका दर आहे. शिवसेनेने त्याप्रकारे १०० बससाठी जाहिरात दिली आहे. तसंच, काँग्रेसनं २० बसवर जाहिरात केली आहे. शिवसेनेनं १०० बससाठी सुमारे ४० लाख रुपये जीएसटी आदी करांसह भरले आहेत. तर काँग्रेसनं सुमारे १० लाखांची रक्कम जमा केली आहे. या जाहिरातींमुळं बेस्टच्या खजिन्यात काही लाखांची भर पडली आहे.

जाहिरात अधिक आकर्षक

बेस्टवरील या जाहिरात अधिक आकर्षक ठरण्याचीही शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत याप्रकारे जाहिरातींनी नटलेल्या १२० बस मुंबईतील विविध भागात धावत आहेत.


हेही वाचा -

अखेर तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी

बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळण्याचा मार्ग खुलासंबंधित विषय
ताज्या बातम्या