Advertisement

शेती करणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना कर्जमाफी द्या - भाई जगताप


शेती करणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना कर्जमाफी द्या - भाई जगताप
SHARES

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्याप्रमाणे आता सरकारने शेती करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना देखील कर्जमाफी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे.

एसटी महामंडळामध्ये एक लाख 4 हजार कर्मचारी आहेत. त्यापैकी सुमारे 60 हजार कर्मचारी कमी वेतनावर काम करत आहेत. अशा एसटी कर्मचाऱ्यांचे सरासरी उत्पन्न 12 ते 17 हजारापर्यंतच आहे. त्यामुळे एसटीच्या बहुतेक कर्मचाऱ्यांना उदरनिर्वाहासाठी शेती आणि शेतीपुरक व्यवसायावर अबलंवून राहावे लागते. अशा वेळी एसटी कर्मचाऱ्याला कर्जमाफीपासून वंचित ठेवल्यास त्याच्यावर मोठा अन्याय होईल. परिणामी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी या निकषातून वगळण्यात यावे अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री, महसूलमंत्री आणि परिवहन मंत्र्याकडे करण्यात येणार असल्याची माहिती भाई जगताप यांनी दिली.

एसटी महामंडळ हे उत्पादक महामंडळ असल्याने प्रवासी कर, आयकर आणि विविध कर भरावे लागतात. डिझेल खरेदीतसुद्धा शासनाच्या इतर वाहनांप्रमाणे एसटीला सवलत मिळत नाही. त्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी ठरवून कर्जमाफीसारख्या लाभापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न शासनाने करू नये, असे प्रतिपादन आ. जगताप यांनी केले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा