'शिवसेनेचा जाहीरनामा म्हणजे फुसकानामा'

  Dadar (w)
  'शिवसेनेचा जाहीरनामा म्हणजे फुसकानामा'
  मुंबई  -  

  दादर - पालिका निवडणुकीसाठी भाजपा-शिवेसनेने जाहिरनामे प्रसिद्ध केले आहेत. मात्र आता दोन्ही पक्षांकडून कोणाचा जाहिरनामा योग्य आणि कोणाचा अयोग्य यावर वाद सुरू झाले आहेत. तसेच आपला जाहिरनामा कसा चांगला हे सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी दोन्ही पक्षांच्या सभा देखील सुरू झाल्या आहेत.

  बुधवारी दादरच्या वसंतस्मृती सभागृहात भाजपा जाहिरनामा समितीचे समन्वयक भालचंद्र शिरसाट यांनी 'शिवसेनेचा फुसकानामा' या विषयावर पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. कोणतेही चांगले काम करायचे म्हटले की विरोध करायचा. मग मेट्रो असो वा कोस्टल रोड. तसेच ज्या व्यक्तीला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा विसर पडला त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकास पुरुष असून, ते केवळ विकासच करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.