Advertisement

मुंबईत आखली रत्नागिरीची रणनिती


मुंबईत आखली रत्नागिरीची रणनिती
SHARES

मुंबई - स्थानिक पक्षाच्या राजकारणावरुन रत्नागिरीचे वरिष्ठ नेते आणि प्रभारी भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा सुरु होती. मात्र राष्ट्रवादीनं ते नाराज नसल्याचं स्पष्ट केलंय. मुंबई शहर राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली. तसंच रत्नागिरी जिल्ह्यात पक्ष भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली. तसंच विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस बरोबर आघाडी करण्यावर काँग्रेसबरोबर चर्चा सुरू आहे. ४-१ चा फार्म्यूला काँग्रेससमोर ठेवला असल्याचं तटकरे यांनी सांगितले. नगरपालिका निवडणुकीत स्थानिक स्थरावर आघाडी करण्याचा घेतलेला निर्णय राज्यातील निवडणुकांमधून स्पष्ट होईल असंही त्यांनी म्हटले. विद्यमान नवी मुंबईमहापालिका आयुक्त तुकाराम मुंढे जेव्हा सोलापूरचे जिल्हाधिकारी होते, तेव्हा भाजपाचे असलेल्या विद्यमान पालकमंत्र्यांनी त्यांना बदलण्याची मागणी केली होती. तेव्हा ही भूमिका का घेतली गेली. तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव चुकीचा नाही, 105 नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणलाय. यात केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर काँग्रेस, शिवसेना देखील आहे, असेही ते म्हणाले. तर भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी तर मुंढेंविरोधात तीव्र संघर्ष केला असल्याचंही तटकरे यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा