Advertisement

दादर रेल्वे स्थानकाच्या 'नामांतरा'साठी भीम आर्मीचं आंदोलन

मागील २५ ते ३० वर्षांपासून दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असं करण्यात यावं, अशी मागणी केली जात आहे. याबाबत, रेल्वे प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आलं होतं. मात्र, सरकार आमच्या मागणीकडे सातत्यानं दुर्लक्ष करत असल्याचं भीम आर्मीचे अध्यक्ष अशोक कांबळे यांनी सांगितलं.

दादर रेल्वे स्थानकाच्या 'नामांतरा'साठी भीम आर्मीचं आंदोलन
SHARES

दादर रेल्वे स्थानकास भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं, या मागणीसाठी गुरुवारी सकाळच्या सुमारास भीम आर्मीच्या वतीनं दादर पूर्व स्थानकाबाहेर पोस्टर आणि स्टिकर लावून आंदोलन करण्यात आलं.

मागणीकडे दुर्लक्ष

मागील २५ ते ३० वर्षांपासून दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असं करण्यात यावं, अशी मागणी केली जात आहे. याबाबत, रेल्वे प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आलं होतं. मात्र, सरकार आमच्या मागणीकडे सातत्यानं दुर्लक्ष करत असल्याचं भीम आर्मीचे अध्यक्ष अशोक कांबळे यांनी सांगितलं.

त्यामुळेच आम्ही काही कार्यकर्त्यांच्या मदतीने दादर रेल्वे स्थानकावर आंदोलन केलं. आमच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनसचे स्टिकर लावले, असंही ते म्हणाले.

वर्षावर धडकणार

सरकारने कितीही दुर्लक्ष केलं, तरी दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची आमची मागणी कायम राहणार आहे. गुरुवारी सकाळी केलेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी आमच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. सरकारने आमची मागणी पूर्ण केली नाही तर, येत्या काही दिवसांत आम्ही वर्षा बंगल्यावर धडकणार आहोत.
- अशोक कांबळे, महाराष्ट्र अध्यक्ष, भीम आर्मीहेही वाचा-

दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या - भीम आर्मी

महापरिनिर्वाण दिन: मुख्यमंत्र्यांनी वाहिली डाॅ. आंबेडकरांना आदरांजलीRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा