Advertisement

दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या - भीम आर्मी


दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या - भीम आर्मी
SHARES

दादर रेल्वे स्थानकाला भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्या, अशी मागणी भीम आर्मीचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक कांबळे यांनी केली आहे. या मागणीच पत्र बुधवारी भीम आर्मीनं मध्य रेल्वेला दिलं आहे.
जर ६ डिसेंबरपूर्वी दादर स्थानकाचं नामांतर स्थानकाचे नामांतर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस' केलं नाही तर, आंदोलन करणार, असा इशाराच भीम आर्मीने दिला आहे.


सरकारचं दुर्लक्ष

गेले २५ ते ३० वर्षांपासून दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची मागणी केली जात आहे. याबाबत २ वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं, मात्र, सरकार याकडे सातत्यानं दुर्लक्ष करत असल्याचं कांबळे यांनी म्हटलं आहे.


तरीही नामांतर नाही

कोणत्याही प्रकारचं आंदोलन न करता पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकाला राम मंदिर हे नाव दिलं गेलं. तसंच कोणतीही मागणी किंवी आंदोलन न करता एल्फिन्स्टन स्थानकाला प्रभादेवी हे नाव दिलं. परंतु २५ ते ३० वर्षे झाली, दादर रेल्वे स्थानकाला 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनर्स' हे नाव मिळालेलं नाही, यासाठी लोक मागणी आणि आंदोलनं करत आहेत, मात्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

येत्या ६ डिसेंबरच्या आत दादर रेल्वे स्थानकाला 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनर्स' हे नाव दिलं नाही तर, भाजपाच्या कोणत्याही आमदार आणि खासदारासा चैत्यभूमीवर येऊ देणार नाही. ६ डिसेंबरला दादर रेल्वे स्थानकात संपूर्ण महाराष्ट्रातून लोक 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनर्स' या नावाचं पोस्टर घेऊन येणार आहेत. तसंच, हे पोस्टर्स भीम आर्मीच्या माध्यमातून दादर रेल्वे स्थानकात लावणार आहोत.
- अशोक कांबळे, महाराष्ट्र अध्यक्ष भीम आर्मी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा