भीमा-कोरेगाव प्रकरणाची SIT कडून चौकशी व्हावी, शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पोलिसांच्या मदतीने फडणवीस सरकारने हा दंगलीत स्वतःचा हेतू साध्य करून घेतला आहे.

SHARE

राष्ट्रवादी काॅग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांनी मुख्यमंत्री (Chif minister) उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भीमा-कोरेगाव (Bhimakoregaon) प्रकरणी एसआयटी (SIT) स्थापन करून चौकशी करण्याची मागणी केली आहे. या दोन पानांच्या पत्रात शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केल्याचे कळते. फडणवीस यांनी सत्तेचा चुकीचा वापर करत पत्रकारांना चुकीची माहिती देण्यात आली. 

भीमा-कोरेगाव प्रकरणात पोलिसांनी पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप ही पवारांनी या पत्रात केले आहे.  शरद पवार यांनी पत्रात स्पष्ठ केले  आहे की, पोलिसांच्या मदतीने फडणवीस सरकारने हा दंगलीत स्वतःचा हेतू साध्य करून घेतला आहे. तपास यंत्रणेने मुख्य आरोपींवर कारवाई न करता. मुख्यआरोपींना अंधारात ठेवत नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. सरकार विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी समाजातील सन्मानित नागरिक असल्याचे पवार यांनी पत्रात म्हटले आहे. . 


त्याच बरोबर राज्याचे गृहाराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे भीमा-कोरेगाव आणि निवडणूकीच्या काळात काही नेत्यांचे फोन टेप करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. काॅग्रेसचे नेते दिगविजय सिंह यांनी या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी केली होती. या प्रकरणी देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 


संबंधित विषय
ताज्या बातम्या